झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवसं वाढताना दिसतायत.
नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर योगगुरु बाबा रामदेव आणि त्यांच्या समर्थकांवर मध्यरात्री करण्यात आलेली पोलीस कारवाई गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या सांगण्यावरुनच करण्यात आल्याचं न्यायमित्र राजीव धवन यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं. चार जूनच्या रात्री बाबा रामदेव यांचं आंदोलन चिरडण्यामागे गृहमंत्रालयाचा हात होता आणि हे सर्व पूर्वनियोजीत होते.
न्यायमित्र म्हणून सुप्रीम कोर्टात मदत करत असलेले वकिल राजीव धवन यांनी यासाठी चिदंबरम यांच्या एका मुलाखतीचा संदर्भ समोर ठेवलाय. त्यात चिदंबरम यांनी म्हटले होते की, जर बाबा रामदेव यांनी आंदोलन केले तर, त्यांना शहराबाहेर हलवलं जाईल.