गोवा निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

आगामी गोवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपने २२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काल रात्री जाहीर करण्यात आलेल्या यादीत खासदार श्रीपाद नाईक यांचा अपवाद वगळता सर्व महत्वाच्या नावांचा समावेश आहे.

Updated: Feb 6, 2012, 03:21 PM IST

www.24taas.com, पणजी

 

आगामी गोवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपने २२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काल रात्री जाहीर करण्यात आलेल्या यादीत खासदार श्रीपाद नाईक यांचा अपवाद वगळता सर्व महत्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. श्रीपाद नाईक यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला.

 

दिल्लीत पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक कमिटीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारांची यादी निश्चित केली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अनंत कुमार, संसदीय कमिटीचे अध्यक्ष लालकृष्ण अडवानी, लोकभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील नेते अरुण जेटली आणि मध्यवर्ती निवडणूक कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. भाजपने महाराष्ट्रवादी गोमांतर पार्टीबरोबर निवडणूकपूर्व युती केली आहे.

 

गोव्यात ३ मार्च रोजी मतदान होईल. गोव्यातील ४० विधानसभेच्या जागेपैकी ३१ जागा भाजप तर ८ जागा महाराष्ट्रवादी गोमांतर पार्टी लढवणार आहे. अपक्ष उमेदवारासाठी एक जागा सोडण्यात आली आहे. राज्य भाजपचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर आणि विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांचा पहिल्या यादीत समावेश आहे.