गोव्यात सॅण्ड आर्ट फेस्टीव्हलची झिंग...

गोव्यातल्या मीरामार समुद्र किनाऱ्यावर सॅण्ड आर्ट फेस्टीव्हल भरवण्यात आला आहे. देशातल्या पर्यटकांबरोबरच विदेशातले पर्यंटकांनीही इथं तयार करण्यात आलेली वाळू शिल्पे पाहण्यासाठी गर्दी केली आहे.

Updated: Dec 18, 2011, 04:50 AM IST

झी २४ तास वेब टीम, गोवा

गोव्यातल्या मीरामार समुद्र किनाऱ्यावर सॅण्ड आर्ट फेस्टीव्हल भरवण्यात आला आहे. देशातल्या पर्यटकांबरोबरच विदेशातले पर्यंटकांनीही इथं तयार करण्यात आलेली वाळू शिल्पे पाहण्यासाठी गर्दी केली आहे.

युरोपीयन शिल्पकार सायमन स्मिथ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, आंध्रप्रदेश, गुजरात आणि भूवनेश्वरच्या कलाकारांनी हि शिल्पे साकारली आहेत. ज्यात भव्य राजमहाल, जलपऱ्या, कासवं, ऑक्टोपस, किंग नेपच्यून अशा भव्य कलाकृतींनी पर्यटकांना भूरळ घातली आहे. या शिल्पांच्या माध्यमातून समुद्री जीवांच्या रक्षणाचा संदेशही देण्यात येतो आहे.

या फेस्टीव्हलला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याने येथील कलाकारांचा हुरूप वाढत आहे. त्यामुळे आता ते आणखी वेगवेगळ्या प्रकारची वाळूची शिल्प तयार करण्याचा विचार करीत आहेत.