'टीम अण्णांचा निर्णय घाईघाईत' - मेधा पाटकर

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी टीम अण्णांचा निर्णय म्हणजे ‘घाईघाईत घेतलेला निर्णय’ असल्याचं म्हटलंय.

Updated: Aug 5, 2012, 11:53 PM IST

www.24taas.com, भोपाळ

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी टीम अण्णांचा निर्णय म्हणजे ‘घाईघाईत घेतलेला निर्णय’ असल्याचं म्हटलंय.

 

मेधा पाटकर यांनी टीम अण्णांच्या राजकारणात येण्याच्या निर्णयाचा विरोध केला नाही. मात्र, हा निर्णय त्यांनी घाईघाईत घेतला असल्याचं मेधा पाटकर यांना वाटतंय. हा निर्णय विचारपूर्वक आणि लोकांसोबत चर्चा करून घेतला असता तर चांगलं झालं असतं, असं त्यांनी स्पष्ट केलंय. मेधाताईंना टीम अण्णांचा राजकारणात उतरण्याचा निर्णय खूप मोठी गोष्टही वाटत नाही, कारण प्रत्येक आंदोलनात थोडंफार का होईना पण राजकारण असतं, हे त्या मान्य करतात.

 

‘स्वत: निवडणुकीच्या आखाड्यात शिरल्याशिवाय खूप मोठे बदल घडवून आणणं शक्य नाही, असं वाटल्यामुळे कदाचित टीम अण्णांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला असावा’ हे सांगतानाच त्यांनी निवडणूक पद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदल करण्याची गरज असल्याचंही म्हटलंय. निवडणुकीसाठी लागणारा खर्च हा प्रत्येक पक्षानं न करता हा खर्च सरकारनंच करावा, अशीही त्यांची मागणी आहे.

 

.