'डीएमके'चाही प्रणवदांना पाठिंबा

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची आगेकूच कायम आहे. डीएमके या पक्षानेही आता मुखर्जी यांच्या नावाला संमती दिली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या नावाला आमचा विरोध नाही, असं तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख करुणानिधी यांनी स्पष्ट केलं.

Updated: May 5, 2012, 07:37 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची आगेकूच कायम आहे. डीएमके या पक्षानेही आता मुखर्जी यांच्या नावाला संमती दिली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या नावाला आमचा विरोध नाही, असं तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख करुणानिधी यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांच्या नावाला वाढती पसंती मिळून लागलीये. प्रणवदांचं नाव चर्चेत येताच आता डीएमकेनंही प्रणवदांच्या नावाला आपला विरोध नसल्याचं स्पष्ट केलंय. राष्ट्रपतीपदासाठी प्रणवदांचं नाव पुढे येत असेल, तर त्याला आपला पाठिंबाच राहिल, असे संकेत डीएमकेचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी दिलेत.  भाजपलाही प्रणव मुखर्जींच्या नावावर आक्षेप नाही. राष्ट्रवादीनेही प्रणव मुखर्जींच्या नावाला मान्यता दिली आहे.

दरम्यान, याआधीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुलायम सिंह यादव तसंच राष्ट्रवादीही  मुखर्जींच्या नावावर राजी झाल्याची चर्चा आहे.