पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधी मोडली आणि एलओसीवरून म्हणजेच नियंत्रण रेषेवरुन भारतीय सैन्याच्या कुपवाडा जिल्ह्यातील कर्नाह येथील चौक्यांवर गोळीबार केला. रविवारी संध्याकाळी पाच वाजता गोळीबार सुरू झाला.

Updated: Dec 5, 2011, 10:42 AM IST

झी २४ तास वेब टीम, श्रीनगर

 

पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधी मोडली आणि एलओसीवरून म्हणजेच नियंत्रण रेषेवरुन भारतीय सैन्याच्या कुपवाडा जिल्ह्यातील कर्नाह येथील चौक्यांवर गोळीबार केला. रविवारी संध्याकाळी पाच वाजता गोळीबार सुरू झाला. काही मिनिटे सतत गोळीबार सुरू होता. मात्र  भारताने प्रत्युत्तर दिल्यानंतर हा गोळीबार थांबला.

पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यात एलओसीजवळ शस्त्रसंधी मोडण्याची घटना जवळपास तीन महिन्यांनंतर पुन्हा घडली आहे. रविवारी झालेल्या गोळीबारात जरी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी भारतीय हद्दीतल्या एका मशिदीच्या छताचे मात्र नुकसान झाले आहे.
याआधीही पाकिस्नेतानने ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात असाच गोळीबार केला होता. या हल्ल्यांमध्ये भारताचा एक जेसीओ शहीद झाला होता. यावर भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते.

Tags: