पॉर्न व्हिडिओकांडात दोन मंत्री निर्दोष

कर्नाटकातील अश्लील व्हिडिओ क्लिपिंग प्रकरणात चौकशी करत असणाऱ्या विधानसभा समितीने दोन मंत्र्यांना निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. मात्र, या प्रकरणातील बाकी सदस्यांची कडक शब्दांत निंदा केली आहे.

Updated: Mar 20, 2012, 12:29 PM IST

www.24taas.com, बंगळुरू

 

कर्नाटकातील अश्लील व्हिडिओ क्लिपिंग प्रकरणात चौकशी करत असणाऱ्या विधानसभा समितीने दोन मंत्र्यांना निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. मात्र, या प्रकरणातील बाकी सदस्यांची कडक शब्दांत निंदा केली आहे.

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीशैलप्पा विदारुर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने विधानसभा अध्यक्ष के जी बोपैय्या यांच्याकडे रिपोर्ट पाठवला आहे. या रिपोर्टमध्ये सी सी पाटील आणि कृष्णा पालेमर यांना निर्दोष म्हटलं गेलं आहे.

 

राजीनामा दिलेल्या तीन मंत्र्यांपैकी लक्ष्मण सावदी यांच्या विरोधात पक्का पुरावा आढळला आहे. ७ फेब्रुवारी रोजी मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाहात असताना लक्ष्मण सावदी यांचं चित्रिकरण करण्यात आलं होतं. रिपोर्टमध्ये असं म्हणण्यात आलं आहे क सावदी यांच्या शेजारी बसलेल्या पाटील यांनी मोबाइलवर फक्त एक नजर टाकली होती. याचा अर्थ ते अश्लील क्लिप पाहात होते असा होत नाही. पालेमर यांच्या संदर्भात असा रिपोर्ट दिला आहे की अश्लील क्लिप असणारा मोबाइल हा पालेमर यांचाच आहे याचा कुठलाही पुरावा आढळलेला नाही. त्यामुळए पालेमर आणि पाटील यांना निर्दोष ठरवले गेले आहे.