बंगळूरमध्ये धावणार 'आपली मेट्रो'

कोलकाता, दिल्ली पाठोपाठ आता आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या बंगळूरमध्ये 'नम्मा मेट्रो' (आपली मेट्रो ) च्या पहिल्या टप्प्याचं उदघाटन करण्यात आलं.

Updated: Oct 20, 2011, 10:08 AM IST

झी २४ तास वेब टीम, बंगळूर

कोलकाता, दिल्ली पाठोपाठ आता आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या बंगळूरमध्ये 'नम्मा मेट्रो' (आपली मेट्रो ) च्या पहिल्या टप्प्याचं उदघाटन करण्यात आलं.

 

मेट्रो वाहतूक असलेले बंगळूर हे भारतातील तिसरे शहर झाले आहे. कर्नाटकमधील 'नम्मा मेट्रो' ला आपली मेट्रो म्हटलं जातं.  सुरवातीच्या बंगळुरमधील पूर्व भागात मेट्रो सुरु करण्यात आली आहे. मेट्रोचे उदघाटन केंद्रीय मंत्री कमलनाथ यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडा, भाजप नेते अरुण जेटली, केंद्रीय मंत्री विराप्पा मोईली, अनंत कुमार, बायोकॉनचे व्यवस्थापकिय संचालक किरण मुझुमदार, इन्फोसिसच्या संस्थापक सुधा मूर्ति आणि एअर डेक्कनचे संस्थापक कॅप्टन जी आर गोपीनाथ उपस्थित होते.

 

मेट्रोची वाहतूक सामान्य नागरिकांसाठी सायंकाळी चार वाजता सुरु करण्यात येणार आहे. सहा स्थानकांवरून ती धावणार आहे. मेट्रोमध्ये आणि स्थानकांमध्ये सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक डब्यांना वाय-फाय तंत्रज्ञान आणि इंटरनेट उपलब्ध करून देण्यात आलं आहे.