बायो टॉयलेटला 'बापू' म्हणा - जयराम रमेश

अग्नीसारख्या क्षेपणास्त्रापेक्षा देशाला जास्त गरज आहे ती शौचालयांची, असं म्हटलंय केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी. बरोबरच या ‘बायो टॉयलेटस्’ला ‘बापूं’चं नाव देण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केलीय. आणि दोन्ही वाक्यांवर त्यांना तोंडावर पडायची वेळ आलीय.

Updated: Jun 26, 2012, 05:00 PM IST

www.24taas.com, ओडिशा

 

अग्नीसारख्या क्षेपणास्त्रापेक्षा देशाला जास्त गरज आहे ती शौचालयांची, असं म्हटलंय केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी. बरोबरच या ‘बायो टॉयलेटस्’ला ‘बापूं’चं नाव देण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केलीय. आणि दोन्ही वाक्यांवर त्यांना तोंडावर पडायची वेळ आलीय. ओडिशातील क्षेपणास्त्र चाचणी प्रक्षेपण केंद्राचं उद्घाटन केल्यानंतर जयराम रमेश यांनी केलेल्या या वक्तव्यांवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटल्यात.

 

देशातील सर्व जनतेला पुरतील इतकी शौचालय पुरविणं हे सरकार समोरचं मोठं आव्हान आहे. कारण देशातील जनतेला क्षेपणास्त्रांची नाही तर शौचालयांची जास्त गरज आहे, असं जयराम रमेश यांनी म्हटलंय. ग्रामीण विकासाचं बजेट ९९,००० कोटी रुपये आहे आणि याच्या दुप्पटीपेक्षा जास्त खर्च आपण संरक्षणावर करतो. संरक्षणासाठी १,९३,००० कोटी खर्च करताना ग्रामीण विकासाला आपण मागे टाकता कामा नये, असं स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिलं. डीआरडीओ आणि आपल्यात काहीही मतभेद नाहीत, असं सांगायचंही ते विसरले नाहीत.

 

तसचं पर्यावरणाला हानी न पोहचवणाऱ्या ‘बायो टॉयलेटस्’ला, स्वच्छता चळवळीची सुरुवात करणाऱ्या महात्मा गांधीचं नाव देण्यात यावं, या इको टॉयलेटसला 'बापू' हे नाव देता येईल, असंही वक्तव्यं त्यांनी केलंय. लडाख, सियाचिन यांसारख्या ठिकाणी सैनिकांसाठी बायो टॉयलेटस् बनवली गेली आहेत.

 

.