भाजप मुख्यालयाबाहेर लव जिहादचे पोस्टर !

हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांविरोधात जागरूक राहण्यासंबंधीचे लव जिहादचे पोस्टर आज दिल्ली भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयाबाहेर लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Updated: Jul 9, 2012, 09:13 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांविरोधात जागरूक राहण्यासंबंधीचे लव जिहादचे पोस्टर आज दिल्ली भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयाबाहेर लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

या पोस्टरमध्ये हिंदूंना लव जेहादच्या विरोधात जागरूक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या पोस्टरमध्ये हिंदूंना आपल्या धर्माची आणि मुली-सुनांची रक्षा करण्यासाठी सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता आमिर खान आणि सैफ अली खान यांचे उदाहरण देण्यात आले आहे. या दोघांनी कसे हिंदू मुलींशी लग्न करून त्यांनी सोडून दिले आहे.

 

सध्या हे पोस्टर भाजप मुख्यालयावरून हटविण्यात आले आहे. परंतु हे पोस्टर कट्टर हिंदूत्ववादी संघटना भगत सिंह क्रांती सेनेने लावले होते. या पोस्टरवर मात्र, विरोधी लव जिहाद फ्रंट असे संघटनेचे नाव लिहिले आहे. भगत क्रांती सेनेने काही दिवसांपूर्वी काश्मिर मुद्द्यावर विवादास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला केला होता.

 

या पोस्टरवर मोबाईल नंबर आणि इमेल आयडीही देण्यात आहे आहे.

Tags: