ममतादीदी सांगतील त्याच बातम्या पाहायच्या

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी आज-काल रोज एक नवा फतवा काढत आहेत. आता त्यांनी लोकांना काही वृत्तवाहिन्या बघू नका, किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. असा नियम काढला आहे.

Updated: Apr 20, 2012, 04:44 PM IST

www.24taas.com, कोलकाता

 

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी आज-काल रोज एक नवा फतवा काढत आहेत. आता त्यांनी लोकांना काही वृत्तवाहिन्या बघू नका, किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. असा नियम काढला आहे.

 

एका रॅलीमध्ये लोकांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, “मला जनतेची सेवा करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. जे लोक माझ्याविरुद्ध अपप्रचार करत आहेत, त्यांना मी दाखवून देईन की काम कसं केलं जातं.” २४ परगणा भागात प्रचार करताना ममता दीदींनी दोन वृत्तवाहिन्यांकडे इशारा करत म्हटले, की या वाहिन्या खोट्या बातम्या प्रसारित करतात. आपल्या प्रशासनाबद्दल अफवा पसरवत आहेत. तेव्हा, लोकांनी या वाहिन्या पाहू नयेत.

 

एवढंच नव्हे, तर ममता बॅनर्जीनी काही वृत्तवाहिन्यांची एक यादीच वाचून दाखवली, आणि लोकांनी केवळ हे आणि एवढेच न्यूज चॅनेल्स पाहावेत. यापूर्वीही ममता दीदींनी सरकारमान्य काही बंगाली आणि इंग्रजी वृत्तपत्रांवर बंदी घातली आहे. ममता बॅनर्जींच्या या दडपशाहीवर प्रेस परिषदेचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी आक्षेप घेतला आहे.