मायावतींच्या वाढदिवशी बसपाची यादी जाहीर

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आपल्या ५६ व्या वाढदिवशी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीच्या ४०३ उमेदवारांची यादी जाहीर केली.

Updated: Jan 15, 2012, 02:16 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आपल्या ५६ व्या वाढदिवशी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीच्या ४०३ उमेदवारांची यादी जाहीर केली.

 

बहुजन समाज पार्टीने जाहीर केलेल्या ४०३ उमेदवारांच्या यादीत ८८ मागावर्गीय, ११३ इतर मागास वर्गीय, ८५ मुस्लिमांसह अल्पसंख्यांक आणि ११७ उच्च वर्णीय त्यात ७४ ब्राह्मण उमेदवारांचा समावेश आहे. मायावतींनी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना निवडणूक आचार संहितेचा भंग होऊ नये म्हणून यंदा वाढदिवसा निमित्त कोणत्याही समारंभाचे आयोजन करण्यात आलं नव्हतं असं सांगितलं. चंदीगडच्या उद्यानात सरकारी निधीतून उभारण्यात आलेल्या काँग्रेसच्या चिन्हा संबंधी निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा असंही मायावती म्हणाल्या.

 

मायावतींचे तसंच हत्तीचे पुतळे बसपाचे चिन्ह असल्याच्या कारणावरुन निवडणुका होई पर्यंत झाकून ठेवण्याच्या निवडणुक आयोगाच्या आदेशावर मायावतींनी हल्ला चढवला. या पुतळ्यांची उभारणी सरकारनी निधीतून झाल्याचं आयोगाचे म्हणणं आहे. मायावतींचे याआधीचे वाढदिवस 'आर्थिक सहयोग दिवस' म्हणून भव्य प्रमाणावर साजरे केले जात आणि ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यातरही सापडले. मागच्या वर्षी वाढदिवसाच्या दिवशी मायावतींनी तब्बल ६०० प्रकल्पांची घोषणा केली होती. उत्तर प्रदेशात ५५ विधानसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्याची निवडणूक ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.