www.24taas.com, बंगळुरू
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा आणखी अडचणीत आलेत. सीबीआयनं येडियुरप्पांच्या बंगळुरू आणि शिमोगा इथल्या घरी छापे घालण्यात आलेत. सहा जणांच्या पथकाने हे छापे टाकलेत.
येडियुरप्पा यांच्या मुलांच्या घरांवरही छापे टाकण्यात आलेत. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली येडियुरप्पांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानुसार सीबीआय चौकशी होणार होती. या चौकशीमुळे सीबीआयने छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे.
येडियुरप्पांची अवैध उत्खननप्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. त्यानुसार येडियुरप्पाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्य न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर येडियुरप्पांच्या पाठि आता चौकशीचा ससेमीरा सुरू झाला आहे. सीबीआयनं येडियुरप्पांच्या बंगलोर आणि शिमोगा इथल्या घरी छापे घातलेत.राजवेंद्र आणि विजयेंद्र या त्यांच्या मुलांच्या घरांवर छापे टाकण्यात आलेत. जावई सोहन कुमारच्या घरावरही छापे टाकलेत. बंगलोर आणि शिमोगा इथं आठ ठिकाणी ही कारवाई कऱण्यात आलीय.