www.24taas.com, नवी दिल्ली
लष्करप्रमुख जनरल व्हि. के. सिंह यांच्याबाबत वादाची मालिका सुरुच आहे. लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करुन लष्करप्रमुखांनी प्रोटोकॉल तोडल्याचं बोललं जातं आहे.
तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार अंबिका बॅनर्जी यांनी दलबीर सिंह यांच्या गैरव्यवहारासंदर्भात पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांना पत्र लिहीलं होतं. त्याची एक प्रत लष्करप्रमुख सिंह यांच्याकडे होती. एक वर्षानंतर सिंह यांनी हे पत्र थेट सीबीआयकडे पाठवून सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यांची ही कृती प्रोटोकॉल तोडणारी असल्याचं बोललं जातं आहे.
कारण लष्करप्रमुख थेट अशी मागणी करु शकत नाहीत. दरम्यान, १४ कोटींच्या लाच देण्याच्या प्रस्तावावर सीबीआय चौकशी करत आहे. मात्र लष्करप्रमुखांनी अधिकृत अशी तक्रार सीबीआय़क़डे अद्याप दिली नाही.