लैला आणि दाऊदचे संबंध...

बॉलीवूड अभिनेत्री म्हणून स्ट्रगल करत पाय रोवणा-या लैलानं अंडरवर्ल्डमधलं आपलं स्थान मात्र भक्कम केलं होत. गेल्या दीड वर्षापासून लैला आणि तिचे कुटूबं कुठे गायब झाले याचा पोलिस शोध घेत होता. मात्र अचानक परवेझच्या झालेल्या खुलाशांन लैला खान या नावामागचे रहस्य आता आणखीनच गडद झालंय.

Updated: Jul 5, 2012, 11:31 PM IST

www.24taas.com

 

 

बॉलीवूड अभिनेत्री म्हणून स्ट्रगल करत पाय रोवणा-या लैलानं अंडरवर्ल्डमधलं आपलं स्थान मात्र भक्कम केलं होत. गेल्या दीड वर्षापासून लैला आणि तिचे कुटूबं कुठे गायब झाले याचा पोलिस शोध घेत होता. मात्र अचानक परवेझच्या झालेल्या खुलाशांन लैला खान या नावामागचे रहस्य आता आणखीनच गडद झालंय.

 

बॉलीवुडची लैला... ही लैला आता केवळ  बॉलीवुडची  नाहीतर डी कंपनीची  लैला खान... लैलाचे आणि अंडरवर्ल्डचेच नव्हे तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर यांचे संबध होते हे सा-या जगासमोर आलंय. सुत्रांच्या म्हणण्यानुसार काही दिवसापुर्वीच जम्मू- काश्मीर पोलीसांच्या अटकेत असलेल्या परवेझने  चौकशीत लैलाच्या आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरच्या संबधाची माहिती पोलिसांना दिली. सुत्रांच्या म्हणण्यानुसार लैला खान हा तोच चेहरा आहे, ज्याचे संबंध  पाकिस्तान, आयएसआय आणि पीओके या तिंघाशी आहेत. लैला मात्र नेहमी सगळ्याच्या डोळ्यात धुळफेकत  आपण चंदेरी दुनियाचा भाग असल्याचा मुखवटा धारण करत दुनियेला फसवत राहीली. पण आता हळहळू लैलाच्या मुखवट्याची सच्चाई आता सा-या दुनियेसमोर येणार आहे. लैला खान  अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसाठी काम करत होती. लैला ज्या दिवसापासून गायब झाली होती त्या दिवसापासून  ती केवळ गूढ बनून राहिली होती. कारण दिवसापासून ती आणि तीचे कुटूंब  गाय़ब झालं होत ते आजपर्यंत..

 

काही दिवसापूर्वीचं  लैलाची  गाडी किश्तवाडमध्ये सापडली होती. जिथूनच दिल्ली स्फोटाची  नेटवर्क विणलं गेल होतं. पोलिसांना हा दाट संशय आहे की, लैलाची  कार एमएच झीरो टू - ए वाय ७८६७  दिल्ली स्फोटात  वापरण्यात आली होती. दिल्ली स्फोटामधील प्रमुख आरोपीला जिथं बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्याच जागेजवळ  ही कार सापडली होती आणि म्हणूनच हे रहस्य वाढलय की या सा-या पासून लैला दूर जायचं होतं की, लैलाला दूर करण्यात आलय. बॉलीवूडची ही कलाकार जम्मूला गेल्यावर ती अचानक गायब झाली कशी हा सवाल याच कारणासाठी पोलिसांना सतावत होता. परवेझच्या जबाबाने आता लैलाचे रहस्य आता हळूहळू उलगडायला सुरुवात झालीय. परवेझच्या म्हणण्यानुसार लैलानं जम्मू- कश्मीरचा दौरा केला होता तो, भारताबाहेर जाण्यासाठी.. तिने दुबईला जाण्यासाठी  नेपाळचा मार्गही आखला होता आणि यासाठी तीला मदत करत होते डी कंपनीचे नेटवर्क...

 

लैला आणि दाऊदच्या संबधाचा उलगडा आता झालाय. परवेझच्या बोलण्यातून समोर आलेल्या माहितीनुसार लैलाचा खून झालाय आणि त्यामुळेच लैला खान नावाभोवतीचे रहस्य हे आता जास्तच वाढलंय.