सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीने दंड थोपडले

डिझेल आणि खतांच्या दरवाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्याविरोधात आंदोलन करणार आहे. तशी तयारी राष्ट्रवादीने केली आहे. केंद्रातील सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी असली तरी काँग्रेसला धडा शिकविण्याचा चंग काही नेत्यांनी बांधल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत पुन्हा धुसफूसचे वारे वाहण्याची नांदी मिळाली आहे.

Updated: Apr 25, 2012, 02:12 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

डिझेल आणि खतांच्या दरवाढीवरुन  राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्याविरोधात आंदोलन करणार आहे. तशी तयारी राष्ट्रवादीने केली आहे. केंद्रातील सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी असली तरी काँग्रेसला धडा शिकविण्याचा चंग काही नेत्यांनी बांधल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत  पुन्हा धुसफूसचे वारे वाहण्याची नांदी मिळाली आहे.

नवी दिल्लीत येत्या १६ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चा काढणार आहे. डिझेलवरचं सरकारी नियंत्रण उठवण्याचे संकेत कालच सरकारतर्फे देण्यात आले होते. त्यामुळं डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता आहे. तसंच खतांवरची सबसिडी  कमी करण्याचंही बोललं जातंय. त्यामुळं खते आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे.

या दोन्हींची भाववाढ करु नये अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. तसंच कृषी उत्पादनांवरची निर्यातबंदी उठवावी ही मागणीही पक्षाने सरकारकडे केलीय. राष्ट्रवादीच्या या पवित्र्यामुळे काँग्रेस आणि राष्ठ्रवादीत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.