'सुखोई' लढाऊ विमानांना ब्रेक

पुण्याजवळ झालेल्या अपघातानंतर लोहगाव एअरफोर्स स्टेशनसह देशभरातील सुखोईची सराव उड्डाणे पूर्णपणे थांबविण्यात आली आहेत.

Updated: Dec 15, 2011, 10:11 AM IST

झी २४ तास वेब टीम, बरेली (उत्तरप्रदेश) 

 

भारतीय हवाईदलातील सर्वांत अग्रणी 'सुखोई ३० एमकेआय' लढाऊ विमानाला मंगळवारी दुपारी पुण्याजवळ झालेल्या अपघातानंतर लोहगाव एअरफोर्स स्टेशनसह देशभरातील सुखोईची सराव उड्डाणे पूर्णपणे थांबविण्यात आली आहेत.

 

 

त्रिशुल हवाईदल शक्ति स्टेशन बंद करण्यात आले आहे. तसेच सर्व विमानांची चौकशी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याबाबत त्रिशुल हवाई शक्ति स्टेशनचे प्रशासकीय अधिकारी  एस.के. भटनागर यांनी पिटीआयशी बोलताना दिला आहे. ते म्हणाले, हवाई स्टेशनवरून सर्व सुखाई ३० या लढाऊ विमानांची उड्डाने रद्द करण्यात आली असून चौकशी करण्यात येत आहे.

 

'सुखोई ३० एमकेआय' लढाऊ विमानांना अपघात होणे ही दुर्दैवी आहे. ही घटना सामान्य नाही. यासाठी संपूर्ण चौकशी केली जाईल. सुखोई सारख्या लढाऊ विमानांना अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे. ही लढाऊ विमाने १९९७ पासून भारतीय हवाईदलात दाखल करण्यात आलीत. या विमानांच्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय संरक्षण मंत्री एम. एम. पल्लम राजू यांनी दिले आहेत. कारणांची मिमांसा ही चौकशी न्यायालयामार्फत केली जाईल, असे संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले.