१५ दिवस पेट्रोल दरवाढ टळली!

पेट्रोलियम कंपन्यांनी देशवासियांना नव वर्षाची भेट देत पेट्रोलच्या किमतीत अजिबात वाढ न करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. ही दरवाढ पुढील १५ दिवस होणार नाही. त्यामुळे सामान्यांना दिलासा आहे. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून केंद्र सरकारनंच या दरवाढीला तूर्तास लगाम लावला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Updated: Jan 2, 2012, 09:31 PM IST

    24taas.com, नवी दिल्ली

पेट्रोलियम कंपन्यांनी देशवासियांना नव वर्षाची भेट देत पेट्रोलच्या किमतीत अजिबात वाढ न करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. ही दरवाढ पुढील १५ दिवस होणार नाही. त्यामुळे सामान्यांना दिलासा आहे. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून केंद्र सरकारनंच या दरवाढीला तूर्तास लगाम लावला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

सरकारी तेलकंपन्याकडून पंधरा दिवसांचा आढावा घेऊन दर महिन्याला एक आणि १६ तारखेला पेट्रोलच्या किमतीत बदल करत असतात. पण, काल रविवार आल्यानं तेलकंपन्या आज पेट्रोलचे नवे दर जाहीर करणार होत्या. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरलेल्या मूल्यामुळे पेट्रोलच्या किमतीत लिटरमागे सुमारे २ रुपये १० पैसे ते २ रुपये १३ पैशांची वाढ होण्याची चिन्हं होती. आयातीवरचा वाढीव खर्च जनतेकडूनच वसूल करण्याचं प्लॅनिंग झालं होतं. नवीन वर्षात पेट्रोल दरवाढीची भेट मिळणार असल्यानं जनतेत नाराजी होती. पण, पेट्रोल कंपन्यांना सुबुद्धी झाली आणि त्यांनी पेट्रोलच्या किमती  बदल न करण्याच निर्णय घेतला आहे.