काँग्रेसच्या आमदारांमध्ये जोरदार बाचाबाची

सत्ताधारी आमदारांमध्येच आता कुरघोडीचं राजकारण रंगू लागलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली.

Updated: May 14, 2012, 05:55 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद

सत्ताधारी आमदारांमध्येच आता कुरघोडीचं राजकारण रंगू लागलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली.

जिल्ह्याच्या खरीप आढावा बैठकीत म्हणणं ऐकून न घेतल्यानं सत्तारांचा संताप झाला. त्यामुळं त्यांनी थेट थोरातांवरच आरोप केले. तसंच आज संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंकडं राजीनामा सोपवण्याची धमकीही दिली आहे.

त्यामुळं संध्याकाळी राजीनामा नाट्य रंगण्याची चिन्ह आहेत. सत्तार हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात तर थोरात हे विलासराव गटाचे समजले जातात.  त्यामुळं पक्षांतर्गत कुरघोडीचं राजाकारण रंगू लागल्याचं यानिमित्तानं पुढं आलं आहे.