कापूस उत्पादक शेतक-याची आत्महत्या

जळगाव जिल्ह्यात एका कापूस उत्पादक शेतक-यानं आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडलीय.

Updated: Nov 16, 2011, 03:12 AM IST

झी २४ तास वेब टीम, जळगाव

 

कापसाला दरवाढ मिळावी यासाठी एसटीची तोडफोड होत असताना राज्यभरात वणवा पेटला आहे. यातच जळगाव जिल्ह्यात एका कापूस उत्पादक शेतक-यानं आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडलीय.

 
चोपडा तलुक्यात वेले गावात बाळू पाटील या कर्जबाजारी शेतक-यांनं विषारी किटकनाशक पिऊन जीवनयात्रा संपवली. शेतात केलेली भांडवली गुंतवणूक, त्यानंतर मुलीच्या लग्नासाठी केलेला खर्च यामुळं बाळू पाटील कर्जाच्या खाईत अडकला होता.

 
खासगी आणि सहकारी बँकांच्या दीड लाखांचं कर्ज त्यांच्या अंगावर होतं. कापसाच्या उत्पन्नावर तरी हे कर्ज मिटेल, या आशेवर हा शेतकरी जगत होता. मात्र कापसावर रोगराईचं आलेलं अस्मानी संकट आणि कापसाला योग्य भाव न मिळाल्यानं संकट ओढवलं. यामुळं बाळू पाटील पुरते खचून गेले होते. या विंवचनेतूनच त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.