गरीबिपुढे शेतकऱ्यांने टेकले हात

मुलीच्या उच्चशिक्षणासाठी सनदशीर मार्गानं प्रयत्न करुनही बँका शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देत नसल्यानं हतबल झालेल्या एका शेतक-यानं औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयताच आत्महत्येचा प्रयत्न केला.

Updated: Dec 17, 2011, 11:27 AM IST


झी २४ तास वेब टीम, औरंगाबाद

 

मुलीच्या उच्चशिक्षणासाठी सनदशीर मार्गानं प्रयत्न करुनही बँका शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देत नसल्यानं हतबल झालेल्या एका शेतक-यानं औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयताच आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं शेतक-याचे प्राण वाचले असले तरी त्याची समस्या मात्र अजून कायम आहे.

 

परिस्थिती माणसाला जगूही देत नाही आणि मरुही देत नाही. असं म्हणतात. रावसाहेब नरवडे या गरिब शेतक-याच्या बाबतीत याचा प्रत्यय आलाय. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील भोकनगावचे रहिवाशी असलेले नरवडे हे अशिक्षित असले तरी आपल्या मुलीनं कलेक्टर व्हावं. यासाठी ते जीवाचे रान करताय. बीएस्सी बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत असलेल्या मुलीचा शैक्षणिक खर्च करणं गरीबीमुळं शक्य होत नसल्यानं त्यांनी शैक्षणिक कर्ज मिळविण्यासाठी धडपड सुरु केली.

 

अनेक बँकाकडं अनेक चकरा मारल्या, जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली. मात्र पदरी पडलेल्या निराशेमुळं त्यांनी आपलं जीवनच संपवण्याचा निर्णय घेतला. एज्युकेशन लोनच्या मोठमोठ्या जाहीराती करणा-या बँका गरीबांना दारात उभं करत नाहीत. हे वास्तव आहे. त्यामुळंच मुलीच्या उज्वल भवितव्याची स्वप्ने पाहणा-या नरवडेंसारख्या अनेक बापांना परिस्थितीशी झगडा करावा लागतोय.

 

[jwplayer mediaid="14786"]