www.24taas.com, परभणी
राजकीय दबावामुळं अतिरेक्यांपेक्षा पोलिसांची जास्त दहशत असल्याची घणाघाती टीका अण्णा हजारेंनी परभणीत केली आहे. त्यामुळं पोलीस विभाग लोकायुक्ताच्या कक्षेत आणण्याची गरज असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.
तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर, प्रत्येकवेळी मीच का बोलावं ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अण्णा हजारे यांनी लातूर दौऱ्यात विलासराव देशमुख यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांबाबत मौन बाळगलं होतं. अण्णा सध्या महाराष्ट्र दौर्यावर असून त्यांनी विलासरावांच्या भ्रष्ट्राचारावर काहीच भाष्य केले नव्हते.
त्याला उत्तर देताना अण्णा म्हणाले की विलासरावांच्या प्रश्नावर मीच का बोलायचं? लातूर भेटीदरम्यान विलासरावांवर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अण्णा काहीतरी बोलतील असे अंदाज बांधले जात होते. मात्र अण्णांनी यावर कोणतंही भाष्य केलं नव्हते.