आव्हाडांना कंटाळले, शिवसेनेला मिळाले

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. मुंब्र्याचे नगरसेवक सुधीर भगत यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. सुधीर भगत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Updated: Jan 11, 2012, 01:03 PM IST

www.24taas.com, ठाणे

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. मुंब्र्याचे नगरसेवक सुधीर भगत यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. सुधीर भगत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

आज उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं सुधीर भगत यांनी म्हटलं आहे. आमदार आव्हाड आपल्या वॉर्डात येऊन विकासकामांचं भूमिपूजन करतात, आंदोलनं करतात मात्र आपल्याला विश्वासात घेत नाहीत असा आरोप भगत यांनी केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला असून राष्ट्रवादीतून दशरथ पाटील, आमदार सुभाष भोईर बाहेर पडले आहे. हे राष्ट्रवादीचे तीनही लोक जितेंद्र आव्हाड यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. आम्ही जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना कोणतीच समाधानकारक उत्तर देता आली नाही. त्यानंतर त्यांना आणखी प्रश्न विचारले असता मात्र त्यांनी त्यांचा फोन बंद केला.