उघड्या डिपीमुळे कल्याणकरांच्या जीवाला धोका

कल्याण पुर्वेतील आहेत MSEB च्या उघड्या डिपीतून वायर्स उघड्या लटकत आहेत. ही दुरवस्था गेल्या कित्येक महिन्यांपासून अशीच आहे. कल्याण पुर्वेच्या अनेक भागात अशा उघड्या डिपी जागोजागी आहेत.

Updated: Jan 7, 2012, 05:45 PM IST

राजेश शिंदे, www.24taas.com, कल्याण

 

कल्याण पुर्वेतील आहेत MSEB च्या उघड्या डिपीतून वायर्स उघड्या लटकत आहेत. ही दुरवस्था गेल्या कित्येक महिन्यांपासून अशीच आहे. कल्याण पुर्वेच्या अनेक भागात अशा उघड्या डिपी जागोजागी आहेत. या डिपी नागरिकांच्या विशेषत: शाळेत जाणाऱ्या लहान मुला-मुलींच्या जिवीतासाठी धोका बनल्या आहेत. या खराब अवस्थेतील धोकादायक डिपींबाबत स्थानिक आमदारा मात्र मुग गिळून गप्प आहेत. त्यांचं याकडे काहीच लक्ष नसल्याचा आरोप इथल्या स्थानिकांनी केला आहे.

झी २४ तासनं याची विचारणा MSEB च्या अधिकाऱ्यांना केली असता पठडीतलं उत्तर देत येत्या ६ महिन्यात सर्व डिपी बदलण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

 

पण रोजच्या वापराच्या रस्त्यांवरील अशा उघड्या डिपींमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.