काँग्रेसला दणका, ठाण्याचे विरोधी नेतेपद रद्द

ठाण्याचे विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांची नियुक्ती मुंबई हायकोर्टानं रद्दबातल ठरवली आहे.. राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असतानाही, काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्याचा निर्णय ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी घेतला होता.

Updated: Jul 6, 2012, 08:14 PM IST

www.24taas.com, ठाणे

ठाण्याचे विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांची नियुक्ती मुंबई हायकोर्टानं रद्दबातल ठरवली आहे.. राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असतानाही, काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्याचा निर्णय ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी घेतला होता.

 

हा निर्णय चुकीचा असल्याचंही हायकोर्टानं म्हटलय़. आता राष्ट्रवादीच्या नेत्याची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत. संजय भोईर यांनी याबाबत हायकोर्टात धाव घेतली होती.

ठाण्यातल्या महापालिका विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली होती. ठाणे महापालिकेत विरोधी पक्षांमध्ये राष्ट्रवादीचे संख्याबळ सर्वाधिक आहे. मात्र तरीही ठाणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या मनोज शिंदे यांची निवड महापौरांनी केली होती.

 

शिवसेना आणि काँग्रेसच्या हातमिळवणीतून हा प्रकार घडला होता. तसचं मनोज शिंदे यांच्या निवडीसाठी राष्ट्रवादीचे पत्र उशिरा आल्याचे कारण देण्यात आले होते. त्यानंतर या वादातून ठाणे महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी नगरसेवकांमध्ये राडाही झाला होता.

 

या निवडीला राष्ट्रवादीनं आधी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं, त्यावेळी हायकोर्टानं १५ जूनपर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीनं थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणीवेळी विरोधी पक्षनेत्याच्या निवडीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे.

 

संबंधित बातम्या

सेना-काँग्रेसला सुप्रीम कोर्टाचा दणका…

ठाण्यात राडा, महासभा तहकूब

सेना-NCP नगरसेवकांची पालिकेत राडा

राष्ट्रवादीची काँग्रेसला धमकी