ज्येष्ठ कवियत्री वंदना विटणकर यांचे निधन

ज्येष्ठ कवियत्री, बालसाहित्यकार आणि बालनाट्याच्या निर्मात्या वंदना विटणकर यांचे दीर्घ आजाराने निधन झालं, त्या ७० वर्षांच्या होत्या. संगीतकार श्रीकांत ठाकरे, गायक मोहम्मद रफी आणि गीतकार वंदन विटणकर या त्र्यीच्या गाण्यांनी मराठी संगीतात अढळ स्थान प्राप्त केलं आहे.

Updated: Dec 31, 2011, 06:53 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई 

 

ज्येष्ठ कवियत्री, बालसाहित्यकार आणि बालनाट्याच्या निर्मात्या वंदना विटणकर यांचे दीर्घ आजाराने निधन झालं, त्या ७०   वर्षांच्या होत्या.

 

संगीतकार श्रीकांत ठाकरे, गायक मोहम्मद रफी आणि गीतकार वंदन विटणकर या त्र्यीच्या गाण्यांनी मराठी  संगीतात अढळ स्थान प्राप्त केलं आहे. हा छंद जिवाला लावी पिसे, शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, हा रुसवा सोड सखे ही  वंदनाताई विटणकरांनी लिहिलेली गाणी आजही तितकीच ताजी टवटवीत वाटतात. आजच्या नेट सॅवी जनरेशनलाही त्यांचे ए  आई, मला पावसात जाऊ दे सारखे गाणे आपलं वाटतं.

 

भावांजली, आनंदगौर, हे गीत चांदण्याचे हे त्यांनी लिहिलेले काव्यसंग्रह  प्रकाशीत झाले आहेत. वंदनाताई विटणकरांनी अनेक बालनाट्यं लिहिली आणि त्यांनी निर्मितीही केली.  वंदना विटणकर यांना अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.