ठाण्यात दोन्ही काँग्रेसमध्ये समेट

कोर्टाच्या दणक्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या श्रेष्ठींनी धावाधाव केल्यावर अखेर ठाणे महापालिकेत दोन्ही काँग्रेसमध्ये समेट झालय. पक्षाच्या स्थानिक नेत्यांची आज बैठक झाली त्यात हा निर्णय झाला.

Updated: Jul 26, 2012, 11:37 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

कोर्टाच्या दणक्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या श्रेष्ठींनी धावाधाव केल्यावर अखेर ठाणे महापालिकेत दोन्ही काँग्रेसमध्ये समेट झालंय. पक्षाच्या स्थानिक नेत्यांची आज बैठक झाली त्यात हा निर्णय झाला.

 

आम्ही शिवसेनेबरोबर कधीच नव्हतो अशी सारवासारव काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केलीय. त्यामुळं आता ठाण्यात युतीला सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सर्व वाद मिटले असून मिटींगमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील प्रदेश पातळीवर पाठवण्यात आलाय.

 

सूत्रांच्या माहितीनुसार पहिली २ वर्ष विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला, अडीच वर्ष शिक्षण मंडळ याखेरीज 1 वर्ष स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले जाईल अशी तडजोड झाल्याचं समजत आहे.