ठाण्यात महापौरपदासाठी घमासान

ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी जोरदार चुरस आहे. उद्या महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे.

Updated: Mar 5, 2012, 02:26 PM IST

www.24taas.com,ठाणे 

 

ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी जोरदार चुरस आहे. उद्या महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. महापालिकेत शिवसेनेकडे सर्वाधिक 53 जागा आहेत. तर मित्रपक्ष भाजपकडे 8 आणि रिपाईकडे 1 जागा आहे. बसपाचे दोन नगरसेवक आणि दोन अपक्षांनी महायुतीला पाठिंबा दर्शवलाय.

 

महायुतीच्या जागांची संख्या 66 होतीय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडे 34 जागा आहेत. काँग्रेसकडे 18 जागा आहेत. पाच अपक्षांनी आघाडीला पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे आघाडीचं संख्याबळ 57 वर पोहचलय. सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला 66 चा आकडा गाठण्यासाठी त्यांना 9 जागांची आवश्यकता आहे.

 

महापालिकेत मनसे सदस्यांची संख्या 7 आहे. या निवडणूकीत मनसेनं अद्याप कुणालाही पाठिंबा दर्शवलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वपूर्ण ठरणारयं. महायुतीतर्फे महापौरपदासाठी हरिश्चंद्र पाटील यांना तर उपमहापौरपदासाठी मिलिंद पाटणकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. आघाडीतर्फे महापौरपदासाठी नजीब मुल्ला आणि उपमहापौरपदासाठी भरत चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचं अपहरण झाल्याच्या बातमीनं खळबळ उडालीय. आघाडी आणि युतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडू लागल्यायते. आता सत्तास्थापनेसाठी महायुती आणि आघाडीची रणनिती कशी असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

महापौरपदासाठी जोरदार चुरस

शिवसेना - 53

भाजप - 08

रिपाई - 01

बसपा - 02

अपक्ष - 02

महायुतीकडे 66 जागा

राष्ट्रवादी - 34

काँग्रेस - 18

अपक्ष - 05

आघाडीकडे 57 जागा

मनसेकडे 07 जागा

पाठिंब्याबाबत मनसेची भूमिका अद्याप स्पष्ट नाही