ठाण्यात महिलेचा मृत्यू, हॉस्पिटलची तोडफोड

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यानं संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्याच्या वर्तक नगर भागात माहेर हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला.

Updated: May 30, 2012, 04:42 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यानं संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्याच्या वर्तक नगर भागात माहेर हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. ज्योत्स्ना बेलोसे असं मृत महिला रुग्णाचं नाव असून, गर्भ पिशवीचे ऑपरेशन सुरु असताना बेलोसे यांचा मृत्यू झाला.

 

डॉक्टरांनी पुरेशी काळची न घेतल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली, तसचं डॉक्टरांनाही मारहाण केली आहे. पोलिसांनी बंदोबस्तात डॉक्टरला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

 

त्यावेळी नातेवाईकांनी पोलिसांनाही लक्ष्य केले. कारवाई होईपर्यंत नातेवाईकांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी माधुरी साखरदांडेंसह २ डॉक्टरांना ताब्यात घेतलं आहे.