ठाण्यात २२ विद्यार्थ्यांना विषबाधा

ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमध्ये २२ जणांना विषबाधा झालीय. हे २२ जण वसतीगृहातील विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर कल्याणच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Updated: Mar 17, 2012, 11:09 AM IST

www.24taas.com, ठाणे

 

ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमध्ये २२ जणांना विषबाधा झालीय. हे २२ जण वसतीगृहातील विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर कल्याणच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे.

 

जेवणातून ही विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  ही सर्व मुलं मुरबाडमधील एनटीटीएस या संस्थेत टूल अँड डाय मेकरचा कोर्स करणारे विद्यार्थी आहेत.  ही सर्व मुलं साधारण १८ ते २० मधील वयोगटातील आहेत.

 

रात्रीच्या जेवणानंतर या विद्यार्थ्यांना उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. त्यांना उपचारासाठी ताबडतोब रुग्णालयात हलविण्यात आलं. तसंच काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी ठाणे, उल्हासनगर इत्यादी ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.