झी २४ तास वेब टीम, भाईंदर
चाकरमानी विश्वासाने आपापल्या गाड्या पार्किंगमध्ये ठेऊन ऑफिसला जातात. पार्किंगमध्ये बाईकच्या रखवालीसाठी मुलं असतात. पण तरीही बाईक चोरी होत असतील तर मग आपल्या गाड्या कुठे सुरक्षित राहतील असा प्रश्न सामान्यांना पडला आहे
भाईंदर रेल्वेस्टेशनजवळच्या पार्किंगमध्ये वाडकर रोज बाईक ठेऊन ऑफिसला जातात. पण २ डिसेंबरला ते ऑफिसमधून परतले तेव्हा पार्किंगमध्ये त्यांची बाईक नव्हती. त्यावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुमची बाईक दिसते का ते पहा असा फुकटचा सल्ला पार्किंगमधल्या सुरक्षारक्षकांनी दिला. वाडकरांची बाईक या चोरानं अत्यंत शिताफीनं पळवली. याबाबत आरपीएफनं वाडकरांची तक्रार दाखल करून घ्यायला नकार दिला. नवघर माणिकपूर पोलिसांनी खडसावल्यानंतर मात्र आरपीएफला तक्रार दाखल करण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
आम्ही इथेचं असतो त्यामुळं बाईकला हँडल लॉक करायची गरज नाही असं या पार्किंगमधले सुरक्षारक्षक सांगतात. त्यामुळं बाईक पळवायला चोरांना मदतच होते. पण हा सगळा प्रकार पाहता, पार्किंगमधल्या सुरक्षारक्षकांची आणि पोलिसांची भूमिका संशयास्पदच वाटते.