www.24taas.com, नवी मुंबई
नवी मुंबईतल्या विमानतळाचा मार्ग मोकळा झालाय. यासंदर्भात वादात अडकलेली 157 एकर जमीन एअरपोर्ट अथॉरिटीला देण्यात यावी, असे आदेश मुंबई हायकोर्टानं सिडकोला दिलेत.
पनवेलमध्ये असलेल्या या जागेवरुन वाद सुरू होता. राज्य सरकारनं ही जागा 1960 साली ताब्यात घेतली आणि तेरा वर्षांनी सिडकोला हस्तांतरित केली होती. मात्र त्याच जागेवर पनवेलजवळच्या उलवे गावातल्या एका कुटुंबानं हक्क सांगितला होता.
पण ही जागा गेली काही वर्षं सिडकोकडे असल्याचं सिद्ध होतंय, त्यामुळे ही जमीन एअरपोर्ट अथॉरिटीला देण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. पण त्याचबरोबर ही जागा उलवे गावातल्या कुटुंबीयांची असल्याचं भविष्यात सिद्ध झालं तर त्यांना मोबदला मिळू शकतो, असंही कोर्टानं म्हंटलंय.