पनवेलमध्ये वाळू तस्करी तेजीत

पनवेल तालुक्यात अनधिकृत शेती, उपसा आणि वाळू तस्करीचा धंदा सध्या जोरात सुरु आहे. पनवेल तहसीलदारांनी पोलिसांच्या मदतीने खारघरमध्ये छापा टाकून अनधिकृत वाळू माफियांवर कारवाई केली. या कारवाईत एक कोटींचं साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Updated: Mar 17, 2012, 09:34 PM IST

www.24taas.com, पनवेल

 

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात अनधिकृत शेती, उपसा आणि वाळू तस्करीचा धंदा सध्या जोरात सुरु आहे. पनवेल तहसीलदारांनी पोलिसांच्या मदतीने खारघरमध्ये छापा टाकून अनधिकृत वाळू माफियांवर कारवाई केली. या कारवाईत एक कोटींचं साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

 

पनवेलमध्ये ढासळलेल्या खाडी किना-यांतर्गत अनधिकृत वाळू उपसा करून  तस्करी करणा-.यांची संख्या वाढत आहे.  सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करणे हा  खरं तर कायदेशीर गुन्हा असला तरी खारघरमध्ये हा प्रकार सर्रास सुरु होता. खारघर पोलिसांच्या मदतीने इथे छापा टाकण्यात आला. तीन बोटी आणि तीन संक्शन पंप सील करण्यात आले आहेत. मात्र, आजही याठिकाणी खुलेआम रेतीचा उपसा होत आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्यचा आरोप करण्यात येत आहे.

 

 

या वाळूमाफियांमधून हानिफ याचं नाव पुढे येत आहे. पोलीस त्याचा तपास करतायेत. अनधिकृत वाळू तस्करी करणा-यांविरुद्ध कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले आबे. मात्र, कारवाई याआधी का झाली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.