महावितरणच्या अधिका-यांना नागरिकांचा घेराव

शेडिंगविरोधात वसईतल्या नागरिकांनी महावितरणच्या अधिका-यांना घेराव घातला. या आंदोलनात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. लोडशेडिंगविरोधात रास्ता रोकोही करण्यात आला होता.

Updated: Oct 11, 2011, 12:04 PM IST

झी २४ तास वेब टीम, वसई

लोडशेडिंगविरोधात वसईतल्या नागरिकांनी महावितरणच्या अधिका-यांना घेराव घातला. या आंदोलनात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. लोडशेडिंगविरोधात रास्ता रोकोही करण्यात आला होता...लोडशेडिंगला विरोध नाही मात्र त्यानंतर तरी वीज पुरवठा नियमीत करा, असा आग्रह नागरिक करतायत... विजेचा लंपडाव असाच सुरु राहिला, तर यापेक्षा मोठं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या भारनियमनामुळं लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्ला चढवून अभियंत्याच्या कक्षाची तोडफोड केली. कक्षाच्या काचा फोडून खुर्चांची तोडफोड करुन लोडशेडिंगविरोधात संताप व्यक्त केला. यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी 10 ते 12 तास लोडशेडिंग होतं. मात्र गेल्या 15 दिवसांपासून ते 20 ते 22 तास झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या लोडशेडिंगमुळं विहिरीतले पंप बंद राहू लागलेत. त्यामुळं पिकं वाळू लागली आहेत. शहरी भागातही लोडशेडिंग वाढल्यामुळं नागरिकांमध्ये संताप आहे. राज्य महामार्ग क्रमांक सहावर रास्तारोको करण्यात आला.

Tags: