मीरा रोडमध्ये ऍसिड टँकर पलटला

ऍसिडने भरलेला एक टँकर पलटी झाल्याची घटना शनिवारी रात्री मीरारोड इथं घडली. ठाणे घोडबंदर रोडवर रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

Updated: Feb 5, 2012, 01:15 PM IST

www.24taas.com, मीरा-भाईंदर

 

एसिडने भरलेला एक टँकर पलटी झाल्याची घटना शनिवारी रात्री मीरारोड इथं घडली. ठाणे घोडबंदर रोडवर रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. टँकर उलटल्यानंतर त्यातून विषारी वायू बाहेर येऊन धूर निघण्यास सुरुवात झाली. यावेळी मीरा-भाईंदर महापालिकेच्या चार गाड्यांना यावेळी पाचारण करण्यात आलं होतं.

 

पाण्याच्या फवा-याच्या सहाय्याने या धूरावर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांना यश आलं. अन्यथा स्फोट होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ठाण्यावरुन गुजरातकडे हा टँकर जात होता. अपघातानंतर टँकरचा ड्रायव्हर आणि क्लीनर दोघंही फरार
झाले.

[jwplayer mediaid="41957"]

 

 

Tags: