मीरा रोडमध्ये फटाक्यांचा स्फोट, ६ जखमी

मीरा रोड येथील नयानगर परिसरात क्रिकेट मॅचच्या बक्षिस वितरण समारंभात फटाक्यांचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याज दीपक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Updated: Dec 25, 2011, 10:45 PM IST

झी २४ तास वेब टीम, मीरा रोड

मीरा रोड येथील नयानगर परिसरात क्रिकेट मॅचच्या बक्षिस वितरण समारंभात फटाक्यांचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याज दीपक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माजी नगरसेवक गिल्बर्ट मेंडोसा यांनी या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते. यावेळी मेंडोसाही उपस्थित होते. धमाका झाल्यानंतर परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते.

Tags: