राष्ट्रवादी-शेकापातील संघर्षाने घेतला बळी

रायगड जिल्ह्यात रोह्यात अष्टमी गावात राष्ट्रवादी आणि शेकाप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या झालेल्या राड्यात एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Updated: Apr 7, 2012, 10:22 PM IST

www.24taas.com,अलिबाग

 

 

रायगड जिल्ह्यात रोह्यात अष्टमी गावात राष्ट्रवादी आणि शेकाप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या झालेल्या राड्यात एकाचा मृत्यू झाला. तर दोघे जण जणमी झालेत. या घटनेमुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण  झाली आहे.

 

 

पालखीचे दर्शन घेण्यावरून वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्याने वातावरण चिघळ्याने बाचाबाची झाली. परिणामी हाणामारी झाली. यात राष्ट्रवादीच्या नथुराम खांडेकर या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. हाणामारीत तलवार, गुप्ती, कोयता आणि काठ्यांचा वापर करण्यात आला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नथुराम गेले असता ही घटना घडली.

 

 

भाविकाची हत्या कऱण्यात आल्याने गावात सन्नाटा पसरला आहे. दोन्ही गटांविरोधात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, शेकाप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये जुना वाद होता का, याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.