अण्णा हजारेंच्या गाडीवर नागपुरात हल्ला

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गाडीवर आज काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात अण्णा सुरक्षित असून हा हल्ला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अण्णांचे सहकारी सुरेश पठारे यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.

Updated: May 16, 2012, 07:57 PM IST

www.24taas.com, नागपूर

 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गाडीवर आज  काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात अण्णा सुरक्षित असून हा हल्ला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अण्णांचे सहकारी सुरेश पठारे यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.

 

नागपूरमधील चिटणीस पार्क येथे ही घटना घडल्याचे पठारे यांनी सांगितले.  काही अज्ञात व्यक्तींनी अण्णांच्या स्कॉर्पिओ गाडीवर  हल्ला झाला. मात्र, त्यावेळी अण्णा गाडी नसल्याने अण्णांना कोणतीही इजा झाली नाही. परंतु, हल्ला झाल्यावर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याचे पठारे यांनी सांगितले.

 

सध्या अण्णा हजारे लोकायुक्तांच्या मागणीसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज अण्णाच्या रॅलीत सोनिया गांधी यांची बदनामी करणारे पुस्तकांचे वाटप करण्यात आले होते. त्याचा राग मनात ठेवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा अंदाज पठारे यांनी व्यक्त केला. परंतु या पुस्तक वाटपाशी आमचा काहीही संबंध नसल्याचेही अण्णांनी स्पष्ट केल्याचे पठारे यांनी सांगितले.

 

[jwplayer mediaid="102247"]