नक्षलवादी हल्ल्यात १२ जवान शहीद

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पुश्तोळा गावाजवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सीआरपीएफचे १५ जवान ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. आज सीआरपीएफचे जवान गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला.

Updated: Mar 27, 2012, 06:20 PM IST

 www.24taas.com,  गडचिरोली

 

 

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पुश्तोळा गावाजवळ नक्षलवाद्यांनी  केलेल्या भूसुरुंग स्फोटात सीआरपीएफचे १२ जवान ठार  झालेत तर २३ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज सीआरपीएफचे जवान गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला.

 

 

भूसुरुंगाच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलातील  पंधरा जवानांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दहा जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांनी गाडी भूसुरुंगाच्या साहाय्याने उडवून दिली. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी रवाना झाले आहेत.
दरम्यान, या संदर्भात विरोधी पक्षाने विधीमंडळात चौकशीची मागणी करून विधीमंडळ दणाणून सोडले.

 

 

यापूर्वीही अशाच प्रकारे गेल्या ७ ऑक्टोबर रोजी छत्तीसगड येथील दंतेवाडा येथे शस्त्र सीमा दलाचे जवान आपल्या बसमधून जात असतांना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता.