नागपूरमध्ये बंटी-बबली

आजच्या प्रत्येक तरूणांची इच्छा असते की, आपण परदेशी नोकरी करावी, तिथे आपल्या आयुष्यातील काही क्षण व्यतित करावे, पण अशाच इच्छुक तरूणांना बंटी-बबली जो़डीने चांगलेच धंद्याला लावले आहे, त्यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

Updated: Dec 8, 2011, 06:20 PM IST

झी २४ तास वेब टीम, नागपूर

 

आजच्या प्रत्येक तरूणांची इच्छा असते की, आपण परदेशी नोकरी करावी, तिथे आपल्या आयुष्यातील काही क्षण व्यतित करावे, पण अशाच इच्छुक तरूणांना बंटी-बबली जो़डीने चांगलेच धंद्याला लावले आहे, त्यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

 

नागपूर पोलिसांनी विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या एका जोडप्याला अटक केली. शिल्पा आणि राजू पालपराती या दांपत्यानं १२ विद्यार्थ्यांची फसवणूक केली. परदेशात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून  बंटी - बबली दुकलीनं विद्यार्थ्यांची फसवणूक केली. या दांपत्यानं विद्यार्थ्यांकडून तीस लाख रूपये उकळले. विद्यार्थ्यांना ट्रॅव्हल व्हिसावर विदेशात नेऊन त्यांना तिथंच सोडण्यात आलं होतं. हा प्रसंग आठवल्यानंर आजही विद्यार्थ्यांना धडकी भरते.

 

[jwplayer mediaid="12209"]