www.24taas.com, नागपूर
नागपूर विद्यापीठातल्या बीकॉमच्या पेपरफुटी प्रकरणी विद्यापीठ प्रशासन खडबडून जागं झालंय. पेपरफुटीप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाची तातडीची बैठक सुरु झालीये. या बैठकीला कुलगुरु, परीक्षा नियंत्रक, अधिष्ठाता आणि चौकशी समितीचे चार सदस्य उपस्थित आहेत.
नागपूर विद्यापीठाच्या राज्यपालांनी गंभीर दखल घेतलीय. चौकशी करुन कारवाई कराण्याचे आदेश राज्यपाल के शंकरनारायण विद्यापीठाला दिलेत. या प्रकरणी राज्यपालांनी कुलगुरूंना पत्र लिहिलं होतं. शुक्रवारी बिझनेस लॉ या विषयाचा पेपर फुटला होता. मात्र शनिवारी परीक्षा झाल्यानंतर पेपरफुटीचा हा प्रकार उघड झाला होता. परीक्षेच्या एक दिवस आधीच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं हस्तलिखित ई-मेलद्वारे मिळालं होतं.
हा पेपर नेमका कसा लीक झाला, याबाबत विद्यापीठाकडे उत्तर नाही. विद्यार्थ्यांनी मात्र फेरपरीक्षा घेण्याची मागणी केलीय. मात्र बीकॉमचे सर्व नियोजित पेपर्स झाल्यानंतरच फेरपरीक्षेबाबत 25 एप्रिलच्या बैठकीत होणार आहे, अशी माहिती व्यवस्थापन परिषदेचे सदस्य महेंद्र निंबार्ते यांनी झी 24 तासशी बोलताना दिली.