रक्तदात्यांची नोंद वेबसाईटवर

मित्राला वेळेत रक्त मिळालं नाही, त्यामुळं तो तडफडून मेला. हे विदारक दृश्य पाहिलं खुशरू पोचा यांनी... त्यासाठी देशभरातल्या 50 हजार रक्तदात्यांची माहिती देणारी एक वेबसाईटच मग त्यांनी सुरू केली. त्यामुळे एका फोनवरही तुम्हाला कुठल्याही भागातल्या रक्तदात्याची माहिती मिळवता येणार आहे.

Updated: Jul 29, 2012, 11:54 PM IST

www.24taas.com, नागपूर

मित्राला वेळेत रक्त मिळालं नाही, त्यामुळं तो तडफडून मेला. हे विदारक दृश्य पाहिलं खुशरू पोचा यांनी... त्यासाठी देशभरातल्या 50 हजार रक्तदात्यांची माहिती देणारी एक वेबसाईटच मग त्यांनी सुरू केली. त्यामुळे एका फोनवरही तुम्हाला कुठल्याही भागातल्या रक्तदात्याची माहिती मिळवता येणार आहे.

एका फोनवर अर्ध्या तासात पिझ्झा मिळतो. पण इतर आवश्यक सुविधा इतक्या कमी वेळात मिळत नाही, अशी आपली ओरड असते. याचाच विचार करुन नागपूरच्या खुशरू पोचा यांनी रुग्णांना असणारी रक्ताची गरज ओळखली.URL|indianblooddonors.com ही वेबसाईट त्यांनी सुरू केली. या वेबसाईटवर पन्नास हजार रक्तदात्यांची नोंद आहे. मित्राला वेळेत रक्त मिळालं नाही. त्यामुळं त्याचा तडफडून मृत्य़ू झाला.

हे पाहूनच खुशरू यांनी ही वेबसाईट सुरू करून गरजुंना याचा निःशुल्क लाभ घेता येईल याची सोय केलीय. 7961907766 या क्रमांकावर फोन केल्यावर देशातल्या कुठल्याही भागातल्या रक्दात्याचा फोन नंबर तुम्हाला मिळेल. खुशरू यांनी सुरूवातीला sms सेवा सुरू केली. पण आता एका फोनवर रक्तदात्याचा फोन नंबर तुम्हाला मिळणार आहे. या निशुल्क सेवेचा निश्चितच गरजूना लाभ होईल.