राष्ट्रवादीने नाक खुपसू- मनसे

मनसेनं कुणासोबत युती करावी हे राष्ट्रवादी नेत्यांनी सांगू नये अशा शब्दांत मनसे आमदार बाळा नांदगांवकर यांनी छगन भुजबळ यांना टोला लगावला आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत मनसेनं शिवसेनेच्या पारड्यात मतं टाकली होती.

Updated: May 30, 2012, 05:20 PM IST

 www.24taas.com, चंद्रपूर

 

मनसेनं कुणासोबत युती करावी हे राष्ट्रवादी नेत्यांनी सांगू नये अशा शब्दांत मनसे आमदार बाळा नांदगांवकर यांनी छगन भुजबळ यांना टोला लगावला आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत मनसेनं शिवसेनेच्या पारड्यात मतं टाकली होती.

 

त्यानंतर उद्धव आणि राज यांनी एकत्र यावं असं भुजबळांनी म्हटलं होतं. भुजबळ यांच्या टोल्याला नांदगावकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी मनसे आणि सेना एकत्र आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भुजबळांनी मनसेला टोला लगावला होता.

 

तर आज त्यांनी वनमंत्र्यांनाही टार्गेट केलं राज ठाकरेंच्या दौऱ्यापाठोपाठ आता वनमंत्री पतंगराव कदम हेही आज ताडोबा दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे आज ताडोबात राज आणि पतंगराव आमनेसामने असणार आहेत. दरम्यान राज यांच्यासह दौऱ्यावर असलेल्या मनसे आमदार बाळा नांदगांवकर यांनी पतंगराव कदम यांच्यावर तोफ डागली आहे.