६०० शिक्षक झाले एकाचवेळी बहिरे...

यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधले ६०० शिक्षक अचानक बहिरे झाले आहेत. बदली टाळण्यासाठी त्यांनी बहिरेपणाचं प्रमाणपत्र सरकारकडे सादर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Updated: May 6, 2012, 05:57 PM IST

www.24taas.com, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधले ६०० शिक्षक अचानक बहिरे झाले आहेत. बदली टाळण्यासाठी त्यांनी बहिरेपणाचं प्रमाणपत्र सरकारकडे सादर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी या शिक्षकांची चौकशी होणार असून दोषी आढळल्यास त्यांना सेवामुक्त करण्याचे संकेत ग्रामविकास खात्यातल्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात झेडपीच्या एकूण २१४६  शाळा आहेत.

त्यातल्या ९०० शिक्षकांची बदली करण्यात येणार आहे. नियमामुसार अपंगांना प्रशासकीय बदलीतून सुट मिळते. त्यामुळं या ६०० शिक्षकांनी आपण बहिरे असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं आहे.