झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी
अण्णा हजारें संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.
संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत जनलोकपाल विधेयकाबाबत चर्चा होणार असून अण्णांनाही मत मांडण्याची संधी आहे. त्यामुळं या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अण्णा मौन व्रतही सोडणार आहेत. मात्र दिल्लीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी अण्णा आज रवाना होणार की उद्या हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नव्हतं.
मौन व्रत आज सोडणार की उद्या हे देखील अद्याप स्पष्ट नसल्याचं अण्णांचे सचिव सुरेश पठारे यांनी सांगितलंय. अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांनीही अण्णांना बैठकीला जाण्याचा आग्रह धरला होता.