झी २४ तास वेब टीम, जळगाव
कापूस दरवाढीच्या आंदोलनानं चांगलाच पेट घेतलाय. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध प्रकारची आंदोलनं छेडली आहेत. जळगावमध्ये भाजपच्या महिला कार्य़कर्त्यांनी कृषिराज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या घरासमोर थाळ्यांचा नाद करत थाळीनाद आंदोलन केलं.
कापसाला सहा हजार रुपये हमीभावाच्या मागणीसाठी भाजपचे आमदार गिरीश महाजन गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. महाजन यांच्या उपोषण स्थळापासून देवकर यांच्या निवासस्थानापर्यंत महिलांनी मोर्चा काढला आणि थाळीनाद आंदोलन केलं.