नाशिकमध्ये आठवर्षीय बालिकेवर बलात्कार

नाशिकमध्ये गेले अनेक दिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. पण गेल्या २४ तासात नाशिकमधील घटनांनी मानवतेला काळिमा फासलेला आहे, एकाच दिवशी नाशिकमध्ये दोन बलात्काराच्या घटना घडल्याने नाशिकमध्ये खळबळ माजली आहे.

Updated: Jan 4, 2012, 02:59 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

नाशिकमध्ये गेले अनेक दिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. पण गेल्या २४ तासात नाशिकमधील घटनांनी मानवतेला काळिमा फासलेला आहे, एकाच दिवशी नाशिकमध्ये दोन बलात्काराच्या घटना घडल्याने नाशिकमध्ये खळबळ माजली आहे.

 

गेल्या काही दिवसात असुरक्षित बनत चाललेल्या नाशिकमध्ये आज पुन्हा खळबळजनक प्रकार घडला आहे. एकाच दिवशी दोन बलात्काराचा संतापजनक प्रकार हा नाशिकमध्ये घडला आहे. नाशिक पंचवटीमध्ये एका तरुणीवर बलात्काराचा प्रकार घडला आहे. सामुहिक बलात्काराच्या या प्रकारात सहा जणाना पोलिसानी अटक केली आहे. एका तरूणीवर सहा तरूणांनी अमानुषपणे बलात्कार केला आहे.

 

या सहाही तरूणांना अटक करण्यात आली आहे.   तर लासलगावमधल्या खडक मळेगावमध्ये एका आठ वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका विकृत वृद्धाला अटक करण्यात आली आहे. आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या तरी पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेच्या प्रश्न निर्माण झाला आहे.