झी २४ तास वेब टीम, जळगाव
निवडणूका जाहीर होताच अनेक समीकरणे बदलू लागतात, अनेक पक्षात बंडाचे निशाण उभारले जाते. त्यामुळेच अनेक वेळस पक्षाला याचा फटका बसतो. यातून मार्ग काढायचा झाल्यास कार्यकर्ते नाराज न होता. पक्षाशी एकनिष्ट राहावेत यासाठी पक्ष काहीही करू शकते यांचीच प्रचिती जळगाव मध्ये आली
निवडणुका जवळ येताच राजकीय नाती, धोरणं कशी बदलतात याचं उदाहरण सध्या जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा नगरपालिका निवडणुकीनिमित्त पहायला मिळतं आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ यांच्यावरील बलात्काराच्या आरोपामुळे त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांच्यावरची निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे.
त्यामुळे रस्ते, ड्रेनेज यासारख्या मुद्द्यांपेक्षाही दिलीप वाघांच्या पुनरागमनाचा मुद्दा या निवडणुकीत गाजतो आहे. पाचोऱ्याच्या २५ जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाप्रणित खान्देश विकास आघाडीमध्ये लढत आहे. दरम्यान, न्यायालयात आरोपपत्र दाखल होण्यापूर्वीच राष्ट्रवादीनं दिलीप वाघांवरील निलंबनाची कारवाई मागे घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.