वाळू माफियांनी तहसीलदाराची गाडी जाळली

जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांनी रात्रीच्या सुमारास चाळीसगावच्या तहसीलदाराची गाडी जाळल्याची घटना घडली आहे. तहसीलदार गाडीत नसल्यानं बचावले असून गाडीचा ड्रायव्हर मात्र जखमी झाला आहे.

Updated: May 3, 2012, 11:04 AM IST

www.24taas.com, जळगाव   

जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांनी रात्रीच्या सुमारास चाळीसगावच्या तहसीलदाराची गाडी जाळल्याची घटना घडली आहे. तहसीलदार गाडीत नसल्यानं बचावले असून गाडीचा ड्रायव्हर मात्र जखमी झाला आहे.

मेहूनबारे गावाजवळ गिरणा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होतो आहे. याचीच चौकशी करण्यासाठी सहा जणांचं पथक रात्रीच्या सुमारास गस्त घालण्यासाठी गेले असताना ही घटना घडली आहे.

तहसीलदार शशिकांत हातगळे यांनी स्थापन केलेल्या अवैध वाळू उपसा विरोधी पथकाची कारवाई सुरू असताना हा हल्ला झाला आहे. हा हल्ला वाळू माफियांनीच केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.