फाळकेंच्या स्मारकासाठी वास्तूच नाही!

चित्रपटसृष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानं नाशिकमध्ये दादासाहेब फाळकेंच्या वास्तूचं स्मारक उभारण्याची घोषण मुख्यमंत्र्यांनी केली खरी, पण ही घोषणा आता घोषणाच राहण्याची शक्यता आहे. कारण नाशिक शहरात फाळकेंची अशी कुठलीही वास्तू शिल्लक नाही.

Updated: May 2, 2012, 08:58 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

चित्रपटसृष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानं नाशिकमध्ये  दादासाहेब फाळकेंच्या वास्तूचं  स्मारक उभारण्याची घोषण मुख्यमंत्र्यांनी केली खरी, पण ही घोषणा आता घोषणाच राहण्याची शक्यता आहे. कारण नाशिक शहरात फाळकेंची अशी कुठलीही वास्तू शिल्लक नाही.

 

मुख्यमंत्र्यांनी केलेली ही घोषणा. मात्र आता नाशिकमध्ये दादासाहेबांची  कुठलीही वास्तू शिल्लकच नाही. कधी काळी नाशिकमध्ये दादासाहेब फाळकेंचं घर होतं... अनेक भारतीय चित्रपट याच वास्तूत जन्माला आले. आता या वास्तूचं चक्क शॉपिंग कॉम्प्लेक्स झालंय. तब्बल ९२ चित्रपट २४ लघुपट या नाशिकमध्येच राहून फाळकेंनी बनवले.चित्रपट सृष्टीचा जन्म झाला तो भद्रकालीतल्या स्टुडिओत. याचंही नुतनीकरण करण्यात आलं. या रस्त्याला फाळके नाव असलं तरी हा स्टुडिओ कुणालाही माहीत नाही..  त्यांची कुठलीही वास्तू आता शिल्लक नाही.. त्यामुळे आता स्मारक कुठे आणि कसं होणार हाच प्रश्न फाळकेंच्या वारसांना पडलाय.

 

महापालिकेनं फाळके स्मारक उभारलं असलं तरी त्याची आता दुर्दशा झालीय. याच स्मारकात चित्रपट निर्मितीचं मार्गदर्शन केंद्र सुरु करावं अशी फाळकेंच्या नातवंडांची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरु झाली असली तरी अजून ठोस काहीच झालेलं नाही. ज्यावेळेला करणं अपेक्षित होतं, त्यावेळी केलं नाही आणि आता उशिरा झालेल्या घोषणेनं दादासाहेबांच्या स्मृती कशा जागवणार हा प्रशन प्रशासनासोबत फाळकेंच्या पुढच्या पिढीलाही पडलाय.